तुम्हाला हिल्स असलेली पादत्राणे परिधान करायला आवडत असतील, पण काही कारणास्तव हिल्स घालून चालताना तुम्हाला काही समस्या येत असतील, तर या टिप्स तुम्हाला नक्की मदत करतील. पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या हिल्स घालून चालाणे आरामदायक वाटायला हवे. अशा परिस्थितीत काही गोष्टी लक्षात ठेवा आणि हिल्स घालून आपली चाल लक्षवेधी बनवा.
- हिल्स परिधान करून चालताना कंबर नेहमी सरळ ठेवावे, आणि चालण्यात आत्मविश्वास ठेवावा.
- हिल्स घातल्यानंतर आपण जमिनीवर पहिल्यांदा आपली टाच ठेवावी आणि नंतर बोटांकडचा भाग ठेवावा. यामुळे आपली चाल देखील सामान्य होईल आणि आपल्याला चालण्यात कोणतीही समस्या येणार नाही.
- हिल्स परिधान केल्यावर पाय फेकत-फेकत चालू नका. आपल्या दोन पायांमधील अंतर देखील कमी ठेवा. शक्यतो मॉडेल्सप्रमाणे कॅट वॉक करा.
- मोठ्या हिल्सचे सँडल घालण्यापूर्वी लो हील्सचे शूज घालून चालण्याचा सराव करा. यामुळे आपल्याला हळूहळू हिल्सचा सराव होईल आणि हिल्स घालण्याची सवय लागेल आणि आपल्याला ते आरामदायक वाटेल.
- हिल्स परिधान केल्यामुळे बर्याच जणांना पायांच्या तळव्याखाली वेदना होतात. अशा वेळी हिल्सचे सँडल घालण्यापूर्वी पायांच्या तळव्याखाली सिलिकॉन हिल्स पॅड वापरा.




