over 216 crore doses of vaccines will be manufactured in india between august december for indians

भारतात कोरोना लसीमुळे पहिला मृत्यू, सरकारी समितीने दिला दुजोरा

देश

नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीमुळे 68 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. सरकारने गठीत केलेल्या समितीने या वृत्तास दुजोरा दिला आहे. वृत्तानुसार, एका 68 वर्षीय व्यक्तीला 8 मार्च रोजी कोरोना लसीचा डोस देण्यात आला होता, त्यानंतर त्याला अ‍ॅनाफिलेक्सिससारखे दुष्परिणाम दिसून आले. त्यानंतर या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही एक प्रकारची ऍलर्जिक रिऍक्शन आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

लस घेतल्यानंतर गंभीर आजार होणे किंवा मृत्यू होणे, याला वैज्ञानिक भाषेत अ‍ॅडवर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनाइझेशन (AEFI) असे म्हणतात. अशा प्रकारची रिऍक्शन झाल्यास शरीरावर खूप वेगाने पुरळ येतात. केंद्र सरकारने AEFI साठी एक समिती गठीत केली आहे. या समितीने लसीकरणानंतर 31 मृत्यूंचे मूल्यांकन केल्यानंतर पहिल्या मृत्यूची पुष्टी केली आहे.

अहवालानुसार, AEFI समितीचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या अहवालात सांगितले आहे की, लस घेतल्यानंतर आणखी दोन जणांना अ‍ॅनाफिलेक्सिसची समस्या झाली होती. त्यांचे वय सुमारे 20 वर्षे होते. मात्र, रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते दोघेही पूर्णपणे बरे झाले. त्यांना 16 आणि 19 जानेवारी रोजी लस देण्यात आली होती. डॉ. अरोरा यांनी या संदर्भात आणखी काही बोलण्यास नकार दिला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत