mamata banerjee

गड आला पण.. ममता बॅनर्जींचा पराभव, जनतेचा कौल मान्य पण कोर्टात जाणार : ममता बॅनर्जी

देश राजकारण

कोलकाता : पश्चिम बंगालमधून भाजपचा मोठा पराभव झाला असला तरी ममता बॅनर्जी यांचा प्रभाव झाला आहे नंदीग्राम मधून भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा विजय झाला आहे. ममता बॅनर्जी यांचा भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी पराभव केल्याचं समजत आहे. पराभव झाल्याचं ममतांनी जवळजवळ मान्य केलं आहे. पण आपण कोर्टात जाणार असल्याचं ममता म्हणाल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ममता बॅनर्जींच्या नेतृत्त्वातील तृणमूल काँग्रेसने मोठा विजय प्राप्त केला आहे. सध्या तृणमूल 215 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 75 जागांवर आघाडीवर आहे. बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमध्ये थेट लढत होती. या लढतीकडे सर्व देशाचे लक्ष लागले होते.

ममता बॅनर्जी म्हणाल्या कि, “मला निकाल मान्य आहे, पण आम्ही कोर्टात जाणार आहोत. मला अशी माहिती मिळत आहे कि निकाल जाहीर झाल्यानंतर काही फेरफार करण्यात आले आहेत. आम्ही त्यातील सत्य शोधणार आहोत आणि ते जनतेसमोर आणू.”  त्या पुढे बोलताने म्हटल्या कि नंदीग्रामबाबत काळजी करु नका. मी नंदीग्राममधून लढले कारण ही एक चळवळ होती. नंदीग्रामच्या लोकांना जो काही निर्णय द्यायचा आहे तो देऊ द्या. तो मला मान्य आहे. मला फरक पडत नाही. पण आम्ही जिंकलो आहोत आणि भाजपचा मोठा पराभव झाला आहे. भाजपने घाणेरडं राजकारण केलं. भाजप हरली आहे. निवडणूक आयोगाचा एकांगीपणा देखील आम्हाला यावेळी सहन करावा लागला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत