मुबई : के एल राहुलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यामुळे पंजाब किंग्सचे नेतृत्व मयांक अग्रवालने सांभाळल होत. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. दीपक हुडा आणि मयांक दोघेही एकाच दिशेला धावले अन् दोघंही धावबाद झाले पण तिसऱ्या पंचांनी दीपक हुडाला धावबाद दिले.
आजच्या मॅच मध्ये पंजाब किंग्सचे फलंदाज गोंधळलेल्या अवस्थेत दिसले. प्रभसिमरन सिंग आणि मयांक अग्रवाल यांनी डावाची सुरुवात केली, परंतु सलग दुसऱ्या सामन्यात प्रभसिमरन सिंगला ( १२) अपयश आलं. त्यानंतर सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ख्रिस गेलनं खणखणीत षटकार मारून रबाडाचं स्वागत केलं. पण, पुढच्याच चेंडूवर रबाडानं ख्रिस गेलला आऊट केलं. डेवीड मलाननं आज कर्णधार मयांकसह तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना पंजाबचा डाव सावरला. १४व्या षटकात विचित्र प्रकार पाहायला मिळाला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मयांक अग्रवालनं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू टोलावला. मयांकला एक धाव घ्यायची होती, परंतु दीपक हुडा त्यासाठी तयार नव्हता. या सर्व गोंधळात दोन्ही फलंदाज एकाच दिशेला धावले अन् दोघंही धावबाद झाले, पण तिसऱ्या पंचांनी दीपक हुडाला धावबाद दिले.
Mayank Agarwal won 100 meters race and deepak hooda lost..
Deepak hooda ran very fast to win but at the end mayank cleverly win the race?#IPL #PBKSvsDC #MIvsCSK #IPL2020 pic.twitter.com/awfH21NNLs— jigar_joshi (@Mrjoshi45) May 2, 2021
पंजाबच्या फलंदाजांमध्ये गोंधळ; एकाच वेळी दोघंही रन आऊट? https://t.co/zImqAk9ye1 via @ipl
— थोडक्यात घडामोडी : MARATHI NEWS – मराठी बातम्या (@thodkyaatnews) May 2, 2021




