The polio virus has detected in the country after 10 years
देश

देशात 10 वर्षांनंतर पुन्हा आढळला पोलिओचा विषाणू , WHO च्या सर्वेक्षणात झाला खुलासा

कोलकाता : कोविडच्या वाढत्या धोक्यादरम्यान आता पुन्हा पोलिओ विषाणू आढळल्याची बातमी आली आहे. WHO ला कोलकात्याच्या नाल्याच्या पाण्यात पोलिओचे जीवाणू सापडले आहेत. याबाबत राज्याच्या आरोग्य विभागासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचीही चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिओ संसर्गाची स्थिती समजून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने वेगवेगळ्या भागातून पाण्याचे नमुने घेतले होते. दरम्यान, पाण्यात पोलिओचे जीवाणू सापडले असून, त्यानंतर तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांनाही कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या मुलांबाबत सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. या मुलांची स्टूल टेस्ट करण्यासही सांगितले आहे. यासोबतच आता पुन्हा एकदा पोलिओ लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्यावर भर दिला जात आहे.

यापूर्वी अखेरीस हावडा येथे 2011 मध्ये पोलिओचा विषाणू आढळला होता. त्यानंतर 2014 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओमुक्त देश घोषित केले. आता 8 वर्षांनंतर त्याचे बॅक्टेरिया कोलकात्यात सापडले असून, त्याचा तपास केला जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत