bride died during sex in wedding night

लग्नाच्या पहिल्याच रात्री सेक्स दरम्यान झाले असे काही… नववधूचा मृत्यू

ग्लोबल

ब्राझील : लग्नानंतर वधू-वरांच्या आयुष्यातील पहिली रात्र खूप महत्वाची मानली जाते. लग्नानंतर दोघेही आपल्या सुखी संसाराची स्वप्न पाहत असतात. परंतु ब्राझीलमध्ये एका नवविवाहित जोडप्याच्या बाबतीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. लग्न झाल्यानंतर संसार सुरू होण्यापूर्वीच या नववधूचा मृत्यू झाला. लग्नाच्या पहिल्याच रात्री सेक्स दरम्यान ही घटना घडली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझीलच्या इबीराइट शहरात ही घटना घडली आहे. घराजवळील फार्म हाऊसमध्ये एका 18 वर्षांच्या मुलीचे लग्न 29 वर्षीय मुलाबरोबर मोठ्या उत्साहात पार पडले. नवविवाहित जोडपे लग्नानंतर खूप आनंदी होते, परंतु हा आनंद फार काळ टिकू शकला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर पहिल्याच रात्री सेक्स दरम्यान या नववधूची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर काही काही कळायच्या आत ती जमिनीवर पडली. हे पाहून तिचा पती अस्वस्थ झाला, त्याने तात्काळ शेजार्‍यांना मदतीसाठी बोलावले. त्यानंतर त्याने पत्नीला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी टॅक्सी बोलावली. परंतु, टॅक्सी चालकाने रुग्णालयात जाण्यास नकार दिला, त्यानंतर दुसर्‍या टॅक्सी ड्रायव्हरला बोलावले, पण त्यानेही जाण्यास नकार दिला आणि आपत्कालीन सेवेला कॉल करण्यास सांगितले. त्यानंतर या व्यक्तीने आपत्कालीन सेवेला कॉल केला.

काही वेळाने पॅरामेडीक स्टाफ त्यांच्या घरी पोहोचला. त्यांनी नववधूला तपासले तेव्हा ती श्वास घेत होती. पॅरामेडिक्स स्टाफला आढळले की त्या नववधूला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांनी तिला हृदयविकाराचा झटका आल्याची पुष्टी केली. त्यानंतर तिला तत्काळ रूग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेण्यात आले, परंतु, तिचा वाटेतच मृत्यू झाला. तिच्या पतीने सांगितले  की रुग्णवाहिका येण्यास सुमारे एक तास लागला आणि त्यामुळे पत्नीचा मृत्यू झाला. तर आपत्कालीन सेवांद्वारे सांगण्यात आले की प्रथम रुग्णवाहिका रद्द करण्यात आली त्यानंतर दुसरी रुग्णवाहिका 21 मिनिटांत पोहोचली होती.

बाबो! दोनदा मृत्यूला हरवलं.. व्हेलने मच्छिमाराला जिवंत गिळलं आणि मग…

दरम्यान, मृत्यूनंतर महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले, त्यामध्ये तिला ब्राँकायटिस हा फुफ्फुसाचा आजार असल्याचे समोर आले. पोलिसांनी सांगितले की वधूच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची हिंसेची चिन्हे नाहीत. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत