US lobster diver claims he was swallowed by a whale

बाबो! दोनदा मृत्यूला हरवलं.. व्हेलने मच्छिमाराला जिवंत गिळलं आणि मग…

ग्लोबल

अमेरिका : अमेरिकेत एक आश्चर्यजनक घटना घडली आहे. येथे एक मच्छीमार एका विशालकाय व्हेल माशाच्या तोंडात गेला होता, परंतु त्यानंतर तो जिवंत बाहेर आला. या मच्छिमाराचे नाव मायकल पॅकार्ड असून तो ५६ वर्षांचा आहे. या संपूर्ण घटनेबद्दल त्याने स्वत: च सांगितले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वृत्तानुसार, मायकल पॅकार्ड सुमारे 30 सेकंद व्हेल माशामध्येच राहिले, परंतु तरीदेखील ते बचावले. मायकेलने या भयानक अनुभवाबद्दल सांगितले की, “मी मॅसाचुसेट्सच्या ईशान्य किनाऱ्यावर लॉबस्टर पकडण्यासाठी समुद्राच्या खाली डुबकी मारत होतो आणि त्यावेळी मी सुमारे 35 फूट खाली होतो. अचानक मला एक मोठा झटका बसला आणि त्यानंतर माझ्यासमोर संपूर्ण अंधार पसरला. मला काय घडत आहे, याची कल्पना नव्हती. नंतर मला वाटले की मी कोणाच्या तरी तोंडात आहे. मला वाटले की कदाचित शार्कने हल्ला केला आहे, परंतु नंतर मला जाणवले की तोंडात कमी दात आहेत त्यामुळे हा शार्क नसावा. कारण शार्कच्या तोंडामध्ये बरेच दात असतात.”

मायकल पॅकार्ड पुढे म्हणाले कि, “मी व्हेल फिशच्या तोंडात अगदी आत होतो, जिथे पूर्णपणे अंधार होता. मी विचार केला की येथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही आणि आपला जीव वाचणे कठीण आहे. त्यावेळी मी फक्त माझ्या मुलांचा विचार करत होतो, जे १२ आणि १५ वर्षांचे आहेत. सुमारे 30 सेकंद मी माशाच्या तोंडातच राहिलो. व्हेलने मला खाण्याचा प्रयत्न केला आणि दात देखील दाबले, परंतु असे असूनही मी व्हेलच्या तोंडातून कसे बाहेर पडलो, हे मला ठाऊक नाही. माझे एकही हाड मोडलेले नाही. परंतु मी जर दातांच्यामध्ये आलो असतो, तर कदाचित जगणे कठीण झाले असते.”

तो भयंकर क्षण आठवताना मायकल पॅकार्ड म्हणाले कि, “मी व्हेलच्या तोंडातून बाहेर येण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली, पण ते अवघड होते. मी बाहेर येण्यासाठी हालचाल केली, तेव्हा व्हेलने डोके हलवण्यास सुरुवात केली आणि सुमारे 30 सेकंदानंतर व्हेलने मला तोंडातून बाहेर फेकले.” त्यानंतर मायकेलला त्याच्या मित्राने त्वरित रुग्णालयात दाखल केले.

मायकेल पॅकार्डने मृत्यूला पराभूत करण्याची ही दुसरी वेळ आहे. नोव्हेंबर २००१ मध्ये झालेल्या विमान अपघातातूनही तो बचावला होता. या दुर्घटनेत पायलट आणि सह-पायलटसह तीन जण ठार झाले होते. मायकेल बचावलेल्या पाच लोकांपैकी एक होता. त्यांनी विमानाच्या रेडिओचा वापर करून मदत मागितली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत