government plans to quarantine those for 15 days who returning from another district says deputy cm ajit pawar

जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल, अजित पवार यांनी दिला इशारा

पुणे महाराष्ट्र

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली की निर्बंध शिथील झाल्यानंतर फिरण्यासाठी जिल्ह्याबाहेर तसंच राज्याच्या बाहेर जाणाऱ्यांना जिल्ह्यात परत आल्यानंतर 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल, तसे आदेश काढावे लागतील, तज्ज्ञांनी तसा सल्ला दिला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अजित पवार म्हणाले की कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही विकेंडला विनाकारण फिरणाऱ्या पर्यटकांमुळं पुन्हा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. नागरिक शनिवार आणि रविवारी मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. त्यामुळे सर्व प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी चर्चा करुन निर्णय घेतला आहे की, पुण्यात शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवांची दुकानं वगळून इतर दुकानं बंद राहतील. सोमवारी ते शुक्रवार नियमांप्रमाणे दुकानं सुरु राहणार आहेत. परिस्थिती नियंत्रणात आली तर कदाचित नियमात बदल केला जाईल.

अजित पवार यांनी यावेळी सांगितलं कि, “सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, उस्मानाबाद या सारख्या जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण जात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी पडलेले 53 टक्के कोरोना रुग्ण 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. 43 टक्के मृत्यू हे कोणतीही को-मॉर्बिडीटी नसलेल्या नागरिकांचे आहेत. तर 20 टक्के मृत्यू हे 31 ते 45 वयोगटातील आहे.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत