मुंबई : राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार सुरु आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक पार पडणार आहे. सध्या आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार आहेत.
1 ऑगस्टला ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्यात आले आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. पहिल्या टप्प्यात सीएसआर फंडातून राज्य सरकार 471 शासकीय शाळांचे परिवर्तन करणार आहे. या शाळांमध्ये अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, इमारत आणि इतर सुविधा उपलब्ध असणार आहेत. तसेच २०२४ पर्यंत ५ हजार शाळांचे परिवर्तन करणार आहे.
For the first phase of the scheme implementation, we plan to turn 471 government schools into model schools. By 2024,we’ll transform 5000 schools. @empathyfound@lfe_ed pic.twitter.com/1QiVHoauwV
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) August 6, 2021




