Dhananjay Munde appeals to avoid crowds to greet Vijayasthambha at Bhima Koregaon
महाराष्ट्र

परदेश शिष्यवृत्ती योजनेत आणखी ५० जागा वाढविण्यात येणार

मुंबई : राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेतील लाभार्थी संख्या 75 वरून वाढवून 200 पर्यंत करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून, आणखी 50 जागांची वाढ याच वर्षीपासून करण्यात येईल तसेच याच शैक्षणिक वर्षात त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. परदेश शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात विद्यार्थ्यांनी मागणी केलेल्या काही निकषात सुधारणा करण्यासंबंधी सह्याद्री अतिगृह येथे मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कला शाखेतील फाईन आर्ट्स, फिल्म मेकिंग, ऍनिमेशन, डिझाईन आदी विषयात परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या विषयात शिक्षण देणारी महाविद्यालय जागतिक क्यू एस रँकिंग च्या 300 मध्ये येत नसल्यामुळे लाभ मिळत नव्हता. त्यामुळे क्यू एस रँकिंग सोबतच क्यूएस पब्लिकेशनकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सब्जेक्ट रँकिंगचा पर्याय ग्राह्य धरण्यात यावा, कला शाखेतील विद्यार्थ्यांनाही या योजनेतून लाभ देता यावा, या अनुषंगाने निकषात बदल करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांनी यावेळी दिले आहेत.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना युरोपियन विद्यापीठांचे आकर्षण आहे, पण सोबतच दक्षिण कोरियातील अनेक विद्यापीठे दर्जेदार त्यांच्याकडील शिक्षणामुळे जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी आले आहेत, या विद्यापीठांकडे देखील विद्यार्थी आकर्षित होतील, या दृष्टीने काही उपाययोजना करण्याचे यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सुचवले.

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेची अर्ज करण्यापासूनची सर्व निवडप्रक्रिया ऑनलाईन करण्यात यावी, तसेच यासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ व प्रशासकीय खर्चाची तरतूद करून देण्यात येईल. यादृष्टीने कार्यवाही करण्याचेही निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत