bollywood actress filed an fir against raj kundra said my private parts video was uploaded on the app fraudulently
मनोरंजन

राज कुंद्राच्या अडचणीत आणखी भर, बॉलिवूड अभिनेत्रीने राज कुंद्रावर केले गंभीर आरोप

नवी दिल्ली : उद्योगपती राज कुंद्रा याला मुंबई गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात अटक केली. त्याने त्याच्या ऍपवर अश्लील व्हिडीओ तयार करून ते प्रसारित केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्यातच या प्रकरणाचा तपास पुढे जात असतानाच अनेक अभिनेत्री आणि मॉडेल समोर येऊन राज कुंद्रावर अनेक धक्कादायक आरोप करत आहेत. आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने राज कुंद्रावर गंभीर आरोप केले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राज कुंद्रा हा कथित पॉर्न व्हिडीओ प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे याबाबत थोडं पुरावे असल्याचे स्पष्ट केले आहे. यासोबतच कुंद्रावर आरोप करण्यात आला आहे की, वेब सीरिजमध्ये भूमिका देण्याच्या बहाण्याने त्याने महिलांना अश्लील चित्रपटांच्या दलदलीत ढकलले. अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींनी या आरोपाची पुष्टी केली आहे.

आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॉर्न व्हिडीओ प्रकरणात आणखी एका पीडितेचा जबाब नोंदवून घेतला आहे. वृत्तानुसार, पीडितेने मालवणी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली असून बुधवारी तिचा जबाब नोंदवला आहे. तिच्या निवेदनात तिने आरोप केला आहे की आरोपीने आश्वासन दिले होते की तिचे प्रायव्हेट पार्ट दाखवले जाणार नाहीत, कारण ती फक्त इंटिमेट दृश्यांचे शूटिंग करत होती. परंतु, नंतर पीडितेला तिच्या एका मित्राकडून समजले की तिचा पॉर्न व्हिडीओ काही दिवसांसाठी अॅपवर उपलब्ध आहे. त्यानंतर पीडितेला समजले की तो संपूर्ण व्हिडिओ कोणत्याही कटशिवाय अपलोड केला गेला आहे, तिचे प्रायव्हेट पार्ट्स देखील व्हिडिओमध्ये दाखवले गेले आहेत. पीडितेने सांगितले की तिने एक करार केला होता आणि शूटिंगसाठी काही हजार रुपयेही मिळाले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत