नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवलं आहे. शिवसेना हे नावही उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. शिवसेना कोण याचा निर्णय निवडणूक आयोगाला करता न आल्यामुळे हा अंतरिम निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असून केवळ आगामी निवडणुकापुरता मर्यादित आहे. हा निर्णय बदलला जाऊ शकतो.
शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं चिन्ह आता शिवेसेनेच्या हातातून निसटलं आहे. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीच्या तोंडावर हा तात्पुरता निर्णय देत हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे दोन्ही गटांना आता हे चिन्ह वापरता येणार नाही. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांचा या चिन्हावर दावा असणार नाहीये.
Shiv Sena’s ‘Bow & Arrow’ symbol claim | Election Commission of India passes interim order, says in Andheri East bye polls neither of the two groups shall be permitted to use the symbol “Bow & Arrow”, reserved for “Shivsena”. pic.twitter.com/QtC9iNhZ0X
— ANI (@ANI) October 8, 2022
या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हे निवडण्यास सांगण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे. दोन्ही गटांना 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत प्रतिसाद द्यावा लागणार आहे. आता उद्धव ठाकरे कोणतं चिन्हं निवडणार याची उत्सुकता आहे.




