Appointment of Anil Kumar Gaikwad as Co-Managing Director of MSRDC
महाराष्ट्र मुंबई

अनिलकुमार गायकवाड यांची एम एस आर डी सी च्या सह- व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र शासनाने दोन वेळा उत्कृष्ट अभियंता या पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव अनिलकुमार बळीराम गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई येथे सह व्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी) या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने आज जाहीर केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अनिलकुमार गायकवाड हे नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते/ बांधकामे) सचिव पदावरून सेवा निवृत्त झाले. त्यांचे महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागात खूप मोठे योगदान आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या कार्यात अनिलकुमार गायकवाड यांचा मोठा सहभाग आहे. जमीन अधिग्रहण पासून ते रस्ते तयार होई पर्यंत ची सर्व तांत्रिक बाजू भक्कम पणे त्यांनी सांभाळली आहे. समृद्धी महामार्गाचे ८५% काम पूर्ण झाले असुन उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी साधारण आणखी दोन वर्षाचा कालावधी लागेल. त्यासाठी गायकवाड यांना सेवानिवृत्ती नंतर त्यांच्या कार्याची दखल घेवून राज्य शासनाने त्यांना एम एस आर डी सी च्या सह- व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती दिली आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती केल्याने समृद्धी महामार्ग लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा आहे.

अनिलकुमार गायकवाड यांनी अनेक महत्त्वाच्या कामातुन आपली ओळख निर्माण केली आहे. त्यापैकी पुणे -मुंबई एक्स्प्रेस वे, मुंबईतील सी-लिंक पुल, मुंबई आणि ठाणे शहरातील जवळपास सर्व उड्डाण पुले, समृद्धी एक्स्प्रेस वे, मुंबई मधील विलासराव देशमुख फ्री वे, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचे आधुनिकीकरण केलेली ईमारत, मुंबई हायकोर्ट इमारत दुरुस्ती, हाई माऊंट बिल्डिंग,  सह्याद्री इमारत, विशेष म्हणजे देशाच्या राजधानी दिल्ली येथील नविन “महाराष्ट्र सदन”, नुकतेच लातुर जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धाटन केलेले देशातील पहिले नवीन टेक्नॉलॉजीचे हायब्रीड पुल, देशातील नदीवर तयार केलेले सर्वांत उंच लोखंडी पुल, देशातील सर्वाधिक लांब असा आठ किलोमीटर चा बोगदा, अशी अनेक महत्त्वाकांक्षी कामे गायकवाड यांच्या कार्यकाळात त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे हाताळली आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि बुद्धिमत्तेचा फायदा राज्याला निश्चितच होईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत