suresh raina reacts on sam curran meme that went virat
क्रीडा

‘रस्त्यात कोणी चॉकलेट दिलं तर खाऊ नको आणि..’, सॅम करनचं Meme तूफान व्हायरल

मुंबई : यावर्षी IPL २०२१ स्पर्धा बायो-बबलमध्ये कोरोनाच्या शिरकावामुळे 29 सामन्यानंतर स्थगित करण्यात आली. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) ऑलराऊंडर सॅम करन याने खूप चांगली कामगिरी केली. मात्र, त्याच्या वयावरून खूप वेळा त्याला ट्रोल करण्यात येतं. IPL २०२१ स्थगित झाले असले, तरी अनेक मिम्स व्हायरल होत असतात.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

त्यातच आता सॅम करनचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. त्यातील एका मीमवर सुरेश रैनाने देखील प्रतिक्रिया दिली आहे. या मीममध्ये सुरेश रैना आणि सॅम करन यांचा एक फोटो शेयर करण्यात आला आहे. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं आहे की, “घरी जा आणि मन लावून अभ्यास कर, रस्त्यात कोणीही अनोळखी माणसाने चॉकलेट दिलं तर ते खाऊन नको घेऊ. या मीमवर सुरेश रैनाने हसणारी इमोजी कमेंट केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत