Irfan Pathan
क्रीडा

मोठं वक्तव्य! हैदराबादच्या खराब खेळाला डेव्हिड वॉर्नरच जबाबदार – इरफान पठाण

मुंबई : आयपीएलचा 14 च्या मोसमात सनरायजर्स हैदराबादची कामगिरी लौकिकाला साजेशी नव्हती. हैदराबादचा संघ गुणतालिकेत तळाशी राहिला. संपूर्ण टीम विजयासाठी संघर्ष करताना दिसली. संघाचा संघनायक डेव्हिड वॉर्नर त्याच्या फॉर्मशी झगडत होता. संघाच्या खराब प्रदर्शनामुळे डेव्हिड वॉर्नरला टीकेला सामोरं जावं लागलं. प्रसंगी त्याच्याकडून संघाचं नेतृत्व काढून घेऊन केन विल्यमसनकडे देण्यात आलं. या साऱ्या प्रकारानंतर अनेक दिग्गजांनी डेव्हिड वॉर्नरवर टीकेचा भडीमार केला. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने देखील हैदराबादच्या खराब खेळाला वॉर्नरलाच जबाबदार धरलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

इरफान पठाण म्हणाले कि, सनरायजर्स हैदराबादचं यंदाच्या वर्षी मला आश्चर्य वाटलं. हैदराबादचा संघ माझ्या चॉप 4 पैकी एक होता. सनरायजर्सच्या संघाची सगळ्यात प्रमुख समस्या ही त्यांची कॅप्टन्सी होती.वॉर्नर ज्याप्रकारे हैदराबादचं नेतृत्व करत होता किंवा बॅटिंग करत होता, त्यामुळे संघाला अडचणी आल्या. वॉर्नरने खराब नेतृत्व केल्यामुळेच केन विल्यमसनकडे संघाचं नेतृत्व दिलं गेलं. टीम मॅनेजमेंट वॉर्नरच्या कॅप्टन्सीवर समाधानी नव्हती किंबहुना नाराज होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत