दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 37 वर्षीय डिव्हिलियर्सने ट्विटरच्या माध्यमातून ही घोषणा केली आणि त्याच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीवर पडदा पडला.
डिव्हिलियर्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले कि, “हा एक अविश्वसनीय प्रवास होता, परंतु मी सर्व क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
It has been an incredible journey, but I have decided to retire from all cricket.
Ever since the back yard matches with my older brothers, I have played the game with pure enjoyment and unbridled enthusiasm. Now, at the age of 37, that flame no longer burns so brightly. pic.twitter.com/W1Z41wFeli
— AB de Villiers (@ABdeVilliers17) November 19, 2021
तो पुढे म्हणाला, “माझ्या मोठ्या भावांसोबत घरामागील अंगणात मॅचेस खेळलो तेव्हापासून मी हा खेळ निखळ आनंदाने आणि अव्याहत उत्साहाने खेळलो आहे. आता, वयाच्या ३७ व्या वर्षी, तितका तेजस्वीपणा राहिला नाही. शेवटी, मला जाणीव आहे की माझ्या कुटुंबाने – माझे पालक, माझे भाऊ, माझी पत्नी डॅनियल आणि माझ्या मुलांनी केलेल्या त्यागाशिवाय काहीही शक्य झाले नसते. मी आमच्या आयुष्याच्या पुढील अध्यायाची वाट पाहत आहे, जेव्हा मी त्यांना खरोखर प्राधान्य देऊ शकेन.”
मी प्रत्येक संघसहकारी, प्रत्येक प्रतिस्पर्धी, प्रत्येक प्रशिक्षक, प्रत्येक फिजिओ आणि प्रत्येक कर्मचारी सदस्याचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी त्याच मार्गावर प्रवास केला आणि दक्षिण आफ्रिकेत, भारतात, मी जिथे जिथे खेळलो तिथे मला मिळालेल्या समर्थनासाठी मी नम्र आहे. टायटन्स, किंवा प्रोटीज, किंवा आरसीबी किंवा जगभरातील खेळ असो, या खेळाने मला अकल्पित अनुभव आणि संधी दिल्या आहेत आणि मी नेहमीच कृतज्ञ राहीन.
या निर्णयाबद्दल बोलताना एबी डिव्हिलियर्स म्हणाला, “मी आरसीबीकडून खेळताना बराच काळ आणि फलदायी वेळ घालवला आहे. नुकतीच अकरा वर्षे उलटून गेली आणि मुलांना सोडून जाणे अत्यंत कटू असते. अर्थात, या निर्णयापर्यंत पोहोचायला खूप वेळ लागला, पण खूप विचार केल्यानंतर, मी थांबायचे आणि माझ्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवायचे ठरवले. मी RCB व्यवस्थापन, माझा मित्र विराट कोहली, संघातील सहकारी, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, चाहते आणि संपूर्ण RCB कुटुंबाचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी या सर्व वर्षांमध्ये माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला पाठिंबा दिला.”
“आरसीबीसोबतचा हा प्रवास संस्मरणीय ठरला आहे. आयुष्यभर जपण्यासाठी वैयक्तिक आघाडीवर खूप आठवणी आहेत. आरसीबी नेहमीच माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या खूप जवळ असेल आणि या अप्रतिम संघाला सपोर्ट करत राहील. मी कायमचा RCBian आहे,” तो पुढे म्हणाला
एबी डिव्हिलियर्सने आरसीबीसाठी 156 सामने खेळले असून 4,491 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या मागे तो दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे आणि RCB इतिहासात मुंबई इंडियन्स विरुद्ध (2015 मध्ये) 133* आणि गुजरात लायन्सविरुद्ध (2016 मध्ये) 129* अशा वैयक्तिक धावसंख्येसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची वैयक्तिक धावसंख्या आहे.




