nordpass report claims 'these' passwords are used the most in india here full list
गॅझेट्स तंत्रज्ञान

भारतात ‘हे’ पासवर्ड सर्वाधिक वापरले जातात, पासवर्ड बनवताना लक्षात ठेवा महत्वाच्या गोष्टी

आपण आपल्या Facebook खात्यापासून Gmail आणि Gpay पर्यंत सर्व गोष्टींसाठी पासवर्ड वापरतो, कारण यामुळे आपला वैयक्तिक डेटा सुरक्षित राहतो. परंतु, यासाठी मजबूत पासवर्ड असणे खूप आवश्यक आहे. परंतु असे अनेक वापरकर्ते आहेत जे अनेक खात्यांसाठी एकच पासवर्ड वापरतात आणि हे पासवर्ड कमकुवत असतात. ते पासवर्ड सहज क्रॅक केले जाऊ शकतात. याबाबतचा अहवाल नॉर्डपासने सादर केला आहे. यामध्ये तुम्हाला त्या पासवर्डची माहिती मिळेल, जे भारतात सर्वाधिक वापरले जातात. चला तर जाणून घेऊया…

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

NordPass च्या अहवालानुसार, जगभरातील वापरकर्ते 123456, 123456789, 111111 आणि 12345 सारखे साधे पासवर्ड वापरतात. हे एका मिनिटात क्रॅक केले जाऊ शकतात. इतकेच नाही तर qwerty, password, dragon, asdfghjkl, asdfgh आणि money असे साधे पासवर्डही वापरले जातात.

भारतात सर्वाधिक वापरण्यात येणारे पासवर्ड
भारताबद्दल सांगायचे झाले तर 12345, 123456, 123456789, 12345678, india123, 1234567890, 1234567, qwerty, abc123, iloveyou आणि xxx हे सर्वाधिक वापरलेले पासवर्ड आहेत. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, india123 वगळता हे सर्व पासवर्ड एका मिनिटात क्रॅक होऊ शकतात. india123 हॅक करण्यासाठी 17 मिनिटे लागली.

कमकुवत पासवर्ड वापरू नयेत
कमकुवत पासवर्ड वापरू नयेत यावर तज्ञ सहमत आहेत. कमकुवत पासवर्ड वापरल्याने तुमचा वैयक्तिक डेटा लीक होण्याचा आणि तुमचे बँक खाते रिकामे होण्याचा धोका असतो.

पासवर्ड बनवताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

  • पासवर्डमध्ये तुमचे नाव वापरू नका
  • 10 ते 15 वर्ण (character) वापरा
  • अल्फाबेट आणि संख्या एकत्र वापरा
  • तुमच्या पासवर्डमध्ये विशेष वर्ण (special character) जोडा
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत