Gurmeet Choudhary

अभिनेता गुरमीत चौधरीची स्तुत्य कामगिरी, अवघ्या १६ दिवसांत उभारले हजार बेड्सचे कोविड हॉस्पिटल

कोरोना नागपूर महाराष्ट्र

मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून रुग्णसंख्या वाढत आहे. अशावेळी सरकारच्या मदतीसाठी काही समाजसेवी संस्था, काही नागरिक तसेच मनोरंजन सृष्टीतील काही कलाकारही गरजू लोकांना मदत करत आहेत. आता अभिनेता गुरमीत चौधरीही कोरोना पेशंटसाठी काम करत आहे. त्याने महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये ‘आस्था’ नावाने कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

काही दिवसांपूर्वी गुरमीतने लखनऊ, पटणा या शहरांव्यतिरीक्त देशातील अन्य काही शहरांमध्ये १ हजार बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू करणार असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण असतील. तसेच देशातील इतर शहरांमध्येदेखील अशा प्रकारची हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रयत्न करत असून लवकरच त्याबाबत सविस्तर माहिती देईन, असेही गुरमीतने त्याच्या ट्विटरवरून सांगितले होते. त्यानुसार त्याने नागपूरमध्ये ‘आस्था’ हे हॉस्पिटल सुरू केले आहे.

गुरुमीत चौधरीने डॉ. सय्यद वजहाताली आणि टीमसोबत एकत्रित काम करून या हॉस्पिटलचे काम पूर्णत्वास नेले आहे. गुरमीतने त्याच्या सहकाऱ्यांसह हॉस्पिटलचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले, ‘अॅव्हेंजरप्रमाणे’ आम्हीही ‘कोरोव्हेंजर’ आहोत. थनॉस आणि त्याचे सैन्य एकत्रितपणे करोनाविरुद्ध लढून त्याला नेस्तनाबूत करून टाकाणार आहोत. डॉ. सय्यद वजहाताली आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने नागपूरमध्ये कोविड केअर हॉस्पिटल सुरू केले आहे. हे सर्व डॉक्टर आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे शक्य झाले आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानतो.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Gurmeet Choudhary (@guruchoudhary)

हॉस्पिटल सुरू केल्यानंतर एका मुलाखतीत गुरमीत चौधरीने सांगितले, “काही दिवसांपूर्वी मीडियामधील एका मित्राने कोरोनाशी संबंधीत मदत मागितली होती तेव्हा मी सोशल मीडियाचा आधार घेतला होता. तेव्हा मला देशातील आरोग्यविषयक परिस्थिती किती बिघडली आहे, याची जाणीव झाली. तेव्हा मी निर्णय घेतला की आता एका खऱ्या नायकाप्रमाणे लोकांना मदत करायला हवी. चाहत्यांनी त्याच्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्यांच्यामुळेच मला आज यश मिळाले आहे. आता चाहत्यांना, या देशातील नागरिकांना माझ्या मदतीची गरज असून त्यांना हवी ती मदत करणार आहे. देशातील अन्य काही शहरांमध्ये कोविड हॉस्पिटल उघडण्यासाठी काम सुरू आहे. देवाची कृपा असेल तर हे काम लवकरच पूर्ण होईल.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत