पुणे : खडकवासला धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज रात्री 11.30 च्या सुमारास खडकवासला धरणाच्या स्पिलवेमधून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. प्रारंभिक विसर्ग 1000 क्युसेक असेल. धरणातील आवक पाहता विसर्ग वाढविण्यात येणार आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तयार राहण्यास सांगण्यात आलेले आहे.
“खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने आज रात्री ११.३० वाजता १ हजार क्यूसेक्स विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात येणार आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी,” असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
#खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने आज रात्री ११.३० वाजता १ हजार क्यूसेक्स विसर्ग #मुठा नदीपात्रात करण्यात येणार आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.@MahaDGIPR @PMCPune
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 11, 2022




