Lpg Gas Leak At Mumbai’s Kasturba Hospital
महाराष्ट्र मुंबई

कस्तुरबा रुग्णालयात गॅसची गळती, मोठा अनर्थ टळला

मुंबई : कस्तुरबा रुग्णालयात एलपीजी गॅसची गळती झाली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. गॅसची गळती नेमकी कशामुळं झाली?, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाहीये. सकाळी ११च्या दरम्यान एलपीजी गॅसची गळती झाल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ रुग्णालय प्रशासनाला याबाबत माहिती दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, रुग्णालयाने तातडीने रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. ज्या ठिकाणी गॅसची गळती झाली आहे तिथे जास्त रुग्ण नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. रुग्णांना बाजूच्या इमारतीत हलवण्यात आलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत