Woman's serious allegations against Sanjay Raut lodged in Mumbai High Court
महाराष्ट्र मुंबई राजकारण

नरेंद्र मोदींना दोन अतृप्त आत्म्यांची शांती करावी लागणार, खातेवाटपावर संजय राऊतांची टीका

मुंबई : लोकसभा निवडणूक पार पडली असून निकालही हाती आले आहेत. नवं सरकार स्थापन झालं असून मंत्रिमंडळही तयार झालंय. या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या वाट्यालासहा मंत्रिपदे आली आहेत. त्यापैकी नितीन गडकरी आणि पियुष गोयल या दोघांना त्यांना पूर्वीची केंद्रीय खाती दिली असून उर्वरित चौघांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद आणि आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आलाय. पुण्याचे भाजपा खासदार मुरलीधर मोहळ यांची पहिल्याच वेळी मंत्रिमंडळात वर्णी लागली असून त्यांच्या वाट्याला अत्यंत महत्त्वाचे नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. रक्षा खडसे यांना युवा आणि क्रीडा खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले आहे. तर, रामदास आठवले यांच्याकडील सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद कायम ठेवण्यात आले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून खातेवाटपही झाले आहे. आता महाराष्ट्रात वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाललेल्या महायुतीने आता विधानसभा लक्ष्य केली आहे. तसंच, विधानसभेच्या जागावाटपासाठी वाटाघाटीही सुरू झाल्याचे समजते. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहुयात.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात भटकती आत्म्याची गोष्ट सुरू होती. त्यावर ठाकरेंनीही उत्तर दिलं होतं. परंतु, आता केंद्रात दोन अतृप्त आत्मा आहेत. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार. या अतृप्त आत्म्यांचं समाधान करा. भटकती आत्मा कधी कोणाचा पाठलाग सोडत नाही, असं पवार म्हणाले आहेत. हे खरं आहे. नरेंद्र मोदींना जोपर्यंत त्यांच्या पदावरून उतरवत नाही तोवर आमची आत्मा शांत होणार आहे. नरेंद्र मोदींना दोन अतृप्त आत्म्यांची शांती करावी लागणार आहे. ज्याप्रमाणे खातेवाटप झालं आहे त्यानुसार सर्वच आत्मा अतृप्त आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत