Sanjay Raut's cautious reaction to Sanjay Rathore's resignation

संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊत यांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले…

महाराष्ट्र राजकारण

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आता संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. यावर संजय राऊतांना विचारलं असता त्यांनी सावध प्रतिक्रिया देत म्हटलं कि, संजय राठोड यांनी राजीनामा दिला की नाही हे मला माहिती नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

संजय राऊत म्हणाले कि, “हा विषय सरकारचा आहे आणि सरकारचे प्रमुख लोक त्यासंबंधात त्यांचं मत व्यक्त करतील किंवा निर्णय घेतील. तसंच, संजय राठोड हे शिवसेनेचे प्रमुख मंत्री आहेत, शिवसेनेचा चेहरा आहेत. त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्याप्रकरणी पोलीस तपासाचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यासंबंधीची माहिती मुख्यमंत्री घेतील.”

मोठी बातमी : संजय राठोड यांचा अखेर राजीनामा… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा स्वीकारणार की नाकारणार याकडे लक्ष

दरम्यान, मातोश्रीवर संजय राठोड यांनी राजीनामा सोपवल्याची चर्चा आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आज पार पडणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत