टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी सामन्यात 317 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाने भेदक मारा करत इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर गुंडाळला.
इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मोईल अलीने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे.
टीम इंडियाने विजय मिळवत क्रमवारीत देखील वरचे स्थान मिळवले आहे. आता क्रमवारीच्या टेबलमध्ये भारत दुसर्या क्रमांकावर आला असून इंग्लंडची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.
⬆️ India move to the No.2 position
⬇️ England slip to No.4Here’s the latest #WTC21 standings table after the conclusion of the second #INDvENG Test! pic.twitter.com/bLNCVyDg4z
— ICC (@ICC) February 16, 2021