Womens T-20 Challenge: Trailblazers vs Supernovas
क्रीडा

Womens T-20 Challenge : आज ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोव्हाज यांच्यात सामना

महिला टी -२० चॅलेंज च्या तिसर्‍या सत्राचा तिसरा सामना ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोव्हाज यांच्यात आज सायंकाळी ७.30 वाजता शारजाहमध्ये खेळला जाईल. ट्रेलब्लेझर्स ची कर्णधार स्मृती मंधाना आणि सुपरनोव्हाजची कर्णधार हरमनप्रीत कौर यांना सामना जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवायचे आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मागील दोन्ही मोसमातील चॅम्पियन्स सुपरनोव्हाज साठी स्पर्धेत कायम राहण्याची ही शेवटची संधी आहे. मोसमातील पहिल्या सामन्यात सुपरनोव्हाजला व्हेलॉसिटी संघाने 5 गडी राखून पराभूत केले होते. अशा परिस्थितीत सुपरनोव्हाजला हा सामना जिंकावा लागेल.

आजच्या सामन्यात ट्रेलब्लेझर्स संघाने विजय मिळविला तर व्हेलॉसिटी संघ अंतिम फेरी गाठेल. सुपरनोव्हाज संघ जिंकला तर नेट रनरेटच्या आधारे मिताली राजच्या नेतृत्वातील व्हेलॉसिटी संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.

मागील सामन्यात व्हेलॉसिटीला ट्रेलब्लेझर्स विरुद्ध केवळ 47 धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरादाखल मंधानाच्या संघाने 7.5 षटकांत 9 विकेट राखून सामना जिंकला. या विजयासह ट्रेलब्लेझर्स चा नेट रनरेट +3.905 वर पोहोचला.

शारजाहमधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे स्लो विकेटमुळे स्पिनर्सनाही खूप मदत होईल. शारजाहमध्ये नाणेफेक जिंकणार्‍या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत