Rishabh Pant, Shardul Thakur and Pravin Amre fined for IPL code of conduct breach

नो-बॉल प्रकरणातील वाद पडला महागात, ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर आणि प्रवीण अमरे यांच्यावर मोठी कारवाई…

क्रीडा

IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला नो-बॉलच्या वादाला खतपाणी घातल्याप्रकरणी आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अडथळा आणल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आयपीएल आयोजकांनी दंड ठोठावला आहे. पंतशिवाय दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज शार्दुल ठाकूर यालाही दंड ठोठावला आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनाही दंड ठोठावण्यात आला, जे सामन्यादरम्यान मैदानावर गेले होते. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दिल्ली संघाचा कर्णधार ऋषभ पंतला सामन्याच्या शुल्काच्या 100% दंड ठोठावण्यात आला आहे. पंतने आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत कलम २.७ च्या लेव्हल २ चे उल्लंघन केल्याचा आरोप मान्य केला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज शार्दुल ठाकूरला त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्यानेही या सर्व प्रकरणात ऋषभ पंतला साथ दिली आणि कलम 2.8 च्या लेव्हल 2 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला. ठाकूर यानेही त्याची शिक्षा मान्य केली आहे.

त्याच वेळी, आयपीएल आचारसंहिता मोडल्याबद्दल दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांना मॅच फीच्या 100% दंड ठोठावण्यात आला आहे. एवढेच नाही तर प्रवीण अमरे यांच्यावर एका सामन्याची बंदीही घालण्यात आली आहे. सामना थांबवण्यासाठी प्रवीण अमरे मैदानात दाखल झाले होते. त्यांनी कलम 2.2 च्या लेव्हल चे उल्लंघन केल्याचा आरोप मान्य करून शिक्षा स्वीकारली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत