IPL 2021: Match between Mumbai Indians and Punjab Kings today
क्रीडा

IPL 2021 : आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना, ‘या’ आकडेवारीवर राहील लक्ष…

IPL 2021 : आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात चेन्नई येथे रात्री ७.३० वाजता सामना होणार आहे. गुणतालिकेत मुंबई संघ चौथ्या क्रमांकावर आहे. तर पंजाबचा संघ 4 सामन्यांपैकी १ सामना जिंकून २ गुणांसह आठव्या म्हणजे शेवटच्या स्थानावर आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल विरुद्ध झालेला मागील सामना गमावला होता. तर पंजाबचा संघ पराभवाची हॅटट्रिक करुन या सामन्यात येत आहे.

सामन्यात या आकडेवारीवर लक्ष राहील :

  1. जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सकडून आपला 100 वा सामना खेळणार आहे. त्याने मुंबईकडून आयपीएलमध्ये 96 सामने आणि चॅम्पियन्स लीगमध्ये 3 सामने खेळले आहेत.
  2. मयंक अग्रवालने आतापर्यंत पंजाब किंग्जकडून 981 धावा केल्या आहेत. म्हणजेच, त्याने 19 धावा पूर्ण करताच या संघासाठी त्याच्या १००० धावा पूर्ण होतील.
  3. मुंबईचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पंड्या आयपीएलमध्ये विकेटचे अर्धशतक ठोकू शकतो. त्याच्या नावावर आतापर्यंत 75 सामन्यांत 49 विकेट्स आहेत.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत