ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पाँटिंगची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला तातडीने पर्थ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो पर्थमध्ये खेळल्या जात असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यादरम्यान कॉमेंट्री करत असताना त्याची तब्येत बिघडली.
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र डेली टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, पॉन्टिंगच्या सहाय्यकांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. पाँटिंगला अस्वस्थ वाटत होते आणि म्हणून तो सावधगिरीच्या तपासणीसाठी रुग्णालयात गेला होता. वृत्तानुसार, पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पाँटिंगला लंचच्या सुमारास पर्थच्या रुग्णालयात नेण्यात आले.
पाँटिंग हा ऑस्ट्रेलियाच्या महान कर्णधारांपैकी एक
पाँटिंग हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ दोनदा (२००३, २००७) एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविजेता बनला.
पाँटिंगची कारकीर्द
पाँटिंगने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 168 कसोटी, 375 एकदिवसीय आणि 17 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 13,378 धावा, एकदिवसीय सामन्यात 13,704 धावा आणि टी-20 मध्ये 401 धावा केल्या आहेत. पाँटिंगच्या नावावर कसोटीत 41 शतके आणि 62 अर्धशतके, वनडेमध्ये 30 शतके आणि 82 अर्धशतके आणि टी-20मध्ये दोन अर्धशतके आहेत. याशिवाय पॉन्टिंगने कसोटीत पाच आणि एकदिवसीय सामन्यात तीन विकेट्स घेतल्या आहेत.