Mumbai beat Delhi by 5 wickets
क्रीडा

IPL 2020 : मुंबईने दिल्लीवर ५ गडी राखून केली मात, मुंबई अव्वल स्थानी

IPL 2020 : गुणतालिकेतील अव्वल स्थानासाठी झालेल्या संघर्षात मुंबईकर दिल्लीच्या संघावर भारी पडले. क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव यांची अर्धशतके आणि शेवटच्या षटकांमधील पोलार्ड-कृणाल पांड्याचा संतुलित खेळ याच्या बळावर मुंबईने दिल्लीवर ५ गडी आणि २ चेंडू राखून मात केली. दिल्ली आणि मुंबई दोन्ही संघाचे ७ सामन्यांत १० गुण असले तरी मुंबई नेट रनरेटच्या बळावर ‘नंबर 1’ ठरली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीच्या डावाची सुरूवात खराब झाली. पहिल्याच षटकात सलामीवीर पृथ्वी शॉ ४ धावांवर माघारी परतला. पहिली संधी मिळालेला अजिंक्य रहाणेही १५ धावांवर बाद झाला. कर्णधार अय्यर आणि सलामी फलंदाज शिखर धवनने दिल्लीचा डाव सावरला आणि १४व्या षटकात संघाला शतक करून दिलं. कर्णधार श्रेयस अय्यर ३३ चेंडूत ४२ धावा काढून बाद झाला. मार्कस स्टॉयनीस आणि शिखर धवन यांच्यात धाव घेण्यावरून झालेल्या गोंधळात स्टॉयनीस १३ धावांवर धावबाद झाला. पण सलामीवीर शिखर धवन शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने ५२ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या.

१६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने संयमी सुरूवात केली. पण कालांतराने कर्णधार रोहित शर्मा मोठा फटका खेळताना ५ धावांवर झेलबाद झाला. सलामीवीर क्विंटन डी कॉकने फटकेबाजी करत ३४ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकलं. या स्पर्धेतील हे त्याचं दुसरं अर्धशतक ठरलं. अर्धशतक झळकावल्यावर क्विंटन डी कॉक लगेचच झेलबाद झाला. त्याने ३६ चेंडूत ५३ धावा केल्या. त्यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने ३२ चेंडूत ५३ धावा करत ६ चौकार आणि १ षटकार खेचला. सूर्यकुमार बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आलेला हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला. त्यानंतर कृणाल पांड्या आणि कायरन पोलार्डने संघाला विजय मिळवून दिला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत