actor Marimuthu passed away due to heart attack

अभिनेते जी मारीमुथू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मनोरंजन

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेते जी मारीमुथू यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 56 वर्षीय अभिनेता आणि दिग्दर्शक जी मारीमुथू यांनी अलीकडेच रजनीकांत स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट जेलरमध्ये काम केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, जी मारीमुथू चेन्नईतील त्यांच्या टीव्ही सीरियल ‘इथर्नीचल’ साठी स्टुडिओमध्ये डब करत होते. अचानक सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना चेन्नईतील जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे मारीमुथू यांना मृत घोषित करण्यात आले.

मारीमुथू यांनी चित्रपट दिग्दर्शन आणि टीव्ही शोमध्ये अभिनय करण्याव्यतिरिक्त 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1990 मध्ये जी मारिमुथू यांनी त्यांचे मूळ गाव पासुमलाईथेरी सोडले आणि चेन्नईला आले. सुरुवातीला त्यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले, त्यादरम्यान त्यांची भेट संगीत लेखक वैरामुथू यांच्याशी झाली.

सुमारे 3 वर्षांच्या संघर्षानंतर, मारिमुथू यांना ‘अरनमानाई किली’ आणि ‘एलामे एन रसथन’ सारख्या चित्रपटांमध्ये दक्षिण चित्रपट निर्माता राज किरण यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. याशिवाय त्यांनी मणिरत्नम, सिलांबरसन आणि वसंतसह अनेक बड्या चित्रपट निर्मात्यांसोबतही काम केले. 2008 मध्ये, मारिमुथू यांनी ‘कन्नम-कन्नम’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन तर केलेच पण चित्रपटाची पटकथा आणि संवाद यावरही काम केले. मात्र, त्यानंतर त्यांनी दिग्दर्शनातून बराच ब्रेक घेतला. 2014 मध्ये त्यांनी पोलीसवाला चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पुनरागमन केले. दिग्दर्शनाव्यतिरिक्त, जी मारीमुथू यांनी दक्षिणेतील अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकाही केल्या आहेत. 2021 मध्ये आलेल्या ‘अतरंगी रे’ या हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत