akshay kumar mother is admitted at hospital in a critical condition

अक्षय कुमारच्या आईची प्रकृती चिंताजनक, अक्षय शूटिंग सोडून लंडनहून परतला

मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया या मुंबईत रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अक्षयच्या आईला शुक्रवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आता त्यांची प्रकृती खालावली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अक्षय कुमारला त्याच्या आईबद्दल समजल्यानंतर, तो शक्य तितक्या लवकर यूकेमधून भारतात आला. अक्षय आज सकाळी भारतात पोहोचला. अक्षय कुमार यूकेमध्ये सिंड्रेला चित्रपटाचे शूटिंग करत होता. अक्षयशिवाय या चित्रपटाचे शूटिंग सुरू राहणार आहे. आता ती दृश्ये चित्रीत केली जातील ज्यात अक्षयची गरज नाही.

गेल्या वर्षी अक्षय कुमारने लंडनमध्ये बेल बॉटम या चित्रपटाचे शूटिंग केले होते. या दरम्यान, त्याने आपल्या आईसोबत वेळ घालवण्याविषयी एक पोस्ट शेअर केली. व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून तो आईसोबत वेळ घालवतो असे त्याने सांगितले होते. त्याने लिहिले होते की, ‘शूटिंगचे दिवस मागे-पुढे घेऊन मी लंडनमध्ये माझ्या आईसोबत वेळ घालवत आहे. तुमचे वय कितीही असो किंवा तुम्ही जीवनात कितीही व्यस्त असलात तरी, तुमचे आईवडील सुद्धा म्हातारे होत आहेत हे विसरू नका … त्यामुळे जमेल तेव्हा त्यांच्यासोबत वेळ घालवा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत