Applications for RTE 25% admission process can be filled from 16th February
महाराष्ट्र शैक्षणिक

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज १६ फेब्रुवारी पासून भरता येणार

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार १ फेब्रुवारी २०२२ पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई पोर्टलवर सदरचे अर्ज १ फेब्रुवारी २०२२ ऐवजी बुधवार १६ फेब्रुवारी २०२२ पासून भरता येतील, संबंधितांनी या बदलाची नोंद घेऊन अर्ज दाखल करावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १२(१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

याबाबत आरटीई पोर्टलवर सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील. पोर्टलवरील वेळोवेळी दिलेल्या सूचनांची सर्व संबंधितांती नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असेही शिक्षक संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत