minor girl rape
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात 7 वर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरातून एका सात वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने तिला बंद कार्यालयात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ती तिच्या वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेली होती, यावेळी घरी परतताना ही घटना घडली. पोलिसांनी संशयिताचे रेखाचित्र तयार केले असून त्याआधारे शोध सुरू केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी दुपारी पुणे स्टेशन परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांची पुणे रेल्वे स्टेशन परिसरात चहाची हातगाडी आहे. ती तिच्या वडिलांना जेवणाचा डबा द्यायला गेली होती. तिथून परत येताना अज्ञात व्यक्तीने तिला उचलून पळवून नेले. त्याने तिला पुणे रेल्वे स्थानकावरील फलाटाच्या बाजूला असलेल्या बांधकाम निरीक्षकाच्या बंद कार्यालयात नेल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. तेथे आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलगी कशीतरी त्या आवारातून पळून जाण्यात यशस्वी झाली. तिने थेट घरी पोहोचून आईला घटनेची माहिती दिली. त्यानंतर आईने तिच्या वडिलांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध सुरू केला आहे. वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर म्हणाले, “आमची टीम संशयिताची ओळख पटवण्यासाठी अनेक लीडवर काम करत आहे. आम्ही संशयिताचे रेखाचित्रही तयार केले असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध विनयभंग, गुन्हेगारी धमकी आणि अपहरण यांसंबंधी कलमे लावली आहेत.

दरम्यान, यापूर्वीही पुणे रेल्वे स्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलीला रिक्षाचालकाने नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली होती. दरम्यान, या घटनेने महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत