Union Minister Nitin Gadkari

‘आम्ही मंत्री आहोत, आम्हाला कायदा मोडण्याचा अधिकार’, नितीन गडकरी असं का म्हणाले? जाणून घ्या…

महाराष्ट्र मुंबई राजकारण

नागपूर : गरिबांच्या हितासाठी कोणताही कायदा आडकाठी आणू शकत नाही. गरीबांच्या कल्याणासाठी कायदा १० वेळा मोडावा लागला तरी तो मोडला पाहिजे, असे महात्मा गांधी म्हणाले होते. म्हणूनच जनतेच्या हितासाठी कायदा मोडण्याचा अधिकार आम्हाला आहे. आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे आम्हाला कायदा मोडण्याचा अधिकार आहे, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नागपूर शाखेच्या बहुविद्याशाखीय मल्टी-मॉडल निकालांतर्गत आदिवासींच्या आरोग्यासाठी ब्लॉसम नावाच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, अधिकाऱ्यांनी ‘येस सर’ म्हणत आम्ही जे सांगतो त्याचे पालन करावे. सरकार अधिकाऱ्यांच्या मताने चालत नाही तर जनतेच्या मताने चालते.

गडकरी पुढे म्हणाले कि, 1995 मध्ये मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री असताना गडचिरोली आणि मेळघाटात कुपोषणामुळे दोन हजार आदिवासी बालकांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. त्यावेळी त्या भागातील 450 गावांना रस्ते नव्हते आणि वनविभागाचे कायदे रस्ते बांधण्यापासून रोखत होते. रस्त्यांअभावी विकास होत नव्हता.त्यावेळी मी माझ्या पद्धतीने तो प्रश्न सोडवला होता. तुम्ही म्हणता तसे सरकार चालणार नाही, हे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवा, असे नितीन गडकरी म्हणाले. त्यामुळे आम्ही सांगू त्यानुसार सरकार काम करेल. नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना सांगितले की, तुम्ही फक्त ‘हो सर’ म्हणा आणि आम्ही दिलेल्या आदेशाचे पालन करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत