Union Minister Nitin Gadkari
महाराष्ट्र

शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अमरावती : शेतकी उत्पादनासोबतच पूरक व्यवसायावर भर द्या. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करुन गुरांच्या चाऱ्यांचे उत्पादन घ्या. जेणेकरुन वर्षभर पशुपालकांना हिरवा चारा उपलब्ध होईल. महागड्या पशुखाद्याला पर्याय म्हणून मका, सोयाबिन, तांदुळाच्या चुरीपासून पशु खाद्य निर्माण करण्यावर भर द्या, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नांदुरा बु. येथील गोकुलम गोरक्षण […]

Union Minister Nitin Gadkari
महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘आम्ही मंत्री आहोत, आम्हाला कायदा मोडण्याचा अधिकार’, नितीन गडकरी असं का म्हणाले? जाणून घ्या…

नागपूर : गरिबांच्या हितासाठी कोणताही कायदा आडकाठी आणू शकत नाही. गरीबांच्या कल्याणासाठी कायदा १० वेळा मोडावा लागला तरी तो मोडला पाहिजे, असे महात्मा गांधी म्हणाले होते. म्हणूनच जनतेच्या हितासाठी कायदा मोडण्याचा अधिकार आम्हाला आहे. आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे आम्हाला कायदा मोडण्याचा अधिकार आहे, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. नितीन गडकरी यांनी […]

Union Minister Nitin Gadkari
महाराष्ट्र

नितीन गडकरींची मोठी घोषणा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी १०० कोटींच्या मदतीला मंजुरी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती ओढवली होती. याचा रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूरला मोठा फटका बसला. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला १०० कोटींची मदत घोषित करण्यात आली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री […]

road damage due to heavy rainfall in maharashtra
महाराष्ट्र

राज्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज

मुंबई : राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे 1 हजार 800 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तविला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे […]

Nitin Gadkari's shocking revelation about vehicle licenses in the country
देश

नितीन गडकरी यांनी केला धक्कादायक खुलासा, देशातील 30 टक्के वाहन परवाने बोगस

नागपूर : देशातील 30 टक्के वाहन परवाने बोगस असल्याचा धक्कादायक खुलासा केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी आपले अधिकारी आणि इंजिनियर्स यांना बोगस लायसन्स तसेच रस्त्यावरचे मृत्यू यासाठी जवाबदार धरले आहे. ते रस्ता सुरक्षा अभियानाच्या एका कार्यक्रमात नागपूरमध्ये बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी आपल्याच विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं आहे. वाहन […]

There will be no tolls on highways in the next two years
देश

पुढील दोन वर्षात टोलनाक्यांपासून होईल मुक्तता, जाणून घ्या कशी?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. “पुढील दोन वर्षात टोलनाक्यांपासून मुक्तता होईल,” असं नितीन गडकरी यांनी जाहीर केलं आहे. “पुढील दोन वर्षात महामार्गांवर कोणताही टोलनाका नसेल, यामुळे वाहनांना पैसे भरण्यासाठी थांबण्याची किंवा वाहनाची गती कमी करण्याची गरज नाही,” असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. नितीन गडकरी […]

Union Minister Nitin Gadkari
महाराष्ट्र राजकारण

राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हाताऱ्या बैलासारखे – नितीन गडकरी

राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हाताऱ्या बैलासारखे आहे. या सरकारला तुतारी घेऊन सतत टोचत राहावे लागते. त्याशिवाय ते पुढेच जात नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नागपुरात केली. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ पूर्व विदर्भाच्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. नितीन गडकरी यावेळी म्हणाले, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा काढण्यात […]