नवी दिल्ली : महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती ओढवली होती. याचा रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूरला मोठा फटका बसला. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला १०० कोटींची मदत घोषित करण्यात आली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी ही घोषणा केली आहे.
मुसळधार पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रस्ते वाहून गेले. या भागांमधील रस्ते दुरुस्तीसाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी १०० कोटींची मदत जाहीर केली आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे कोकणात चिपळूणजवळ वशिष्टी नदीवरील पुलाचे आणि मुंबई-गोवा महामार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास ७२ तासांत दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत केली गेली, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.
Immediate steps have been taken up to restore the roads affected by unprecedented rains in Konkan and Western Maharashtra. 100 Cr has been sanctioned in this regard. This includes 52 Cr for temporary restoration and 48 Cr for permanent restoration.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 5, 2021
गडकरी यांनी सांगितलं कि, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील रस्ते दुरुस्तीसाठी तातडीने पावलं उचलण्यात आली आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी केंद्राने १०० कोटीं मंजूर केले आहेत, असं गडकरी म्हणाले. यात ५२ कोटी रुपये हे तात्पुरत्या डागडुजीसाठी आणि ४८ कोटी रुपये हे कायम स्वरुपी दुरुस्तीसाठी देण्यात आले आहेत. परशुराम घाट, करूळ घाट, आंबा घाट भागातील दुरुस्ती पूर्ण झाली असून अडथळे दूर करण्यात आले आहेत. या भागात तात्पुरत्या स्वरुपाचे काम आधीच सुरू करण्यात आले आहे. तसंच कायम स्वरुपी दुरुस्तीचे कामही प्राधान्याने केले जाईल.
Interruptions at Parshuram Ghat, Karul Ghat, Amba Ghat have also been cleared. Temporary restoration work are already initiated and permanent restoration works will also be taken on priority.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 5, 2021




