Health Minister Prof. Dr. Tanaji Sawant

टेलिमेडिसीन ही सुविधा देण्यासाठी ई–संजीवनी योजना – आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

महाराष्ट्र

मुंबई : मे. मायक्रोसॉफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी करार जरी संपुष्टात आला असला तरी आयुष्यमान भारत ई-संजीवनी योजनेतंर्गत टेलिमेडिसीन ही सुविधा रूग्णांना दिली जात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली. अमरावती जिल्ह्यातील हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रातील टेलिमेडिसीन सेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना मंत्री डॉ. सावंत बोलत होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मंत्री डॉ. सावंत म्हणाले, संपूर्ण राज्यात सन २००७-२००८ मध्ये तत्कालीन सरकारने मे. मायक्रोसॉफ्ट इंडिया प्रा.लिमिटेड यांच्याशी टेलिमेडिसीन बाबतीत केलेला करार संपुष्टात आला असला तरी त्याच धर्तीवर आयुष्यमान भारत योजनेतंर्गत ई-संजीवनी योजनेतून टेलिमेडिसीन ही सुविधा रूग्णांना दिली जात आहे. तसेच मे. मायक्रोसॉफ्ट इंडिया प्रा. लिमिटेड ही संस्था सामाजिक उत्तरदायित्वच्या माध्यमातून राज्याला सुविधा देऊ शकत असेल, तर शासन पुन्हा या संस्थेशी करार करायला तयार आहे. आयुष्यमान भारत ई – संजीवनी योजनेंतर्गत १० हजार ५८५ प्राथमिक आरोग्य उपक्रेंद्रांत ५४ लक्ष ७५ हजार रूग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच आगामी काळात रूग्णांना गोल्डन हावर मध्ये उपचार मिळण्याकरिता लवकरच नवीन योजना आणत आहोत, अशीही माहिती मंत्री डॉ. सावंत यांनी दिली. या प्रश्नाच्या चर्चेत विधानपरिषद सदस्य सतेज पाटील, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत