Rhea Chakraborty
मनोरंजन

रिया चक्रवर्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

रिया चक्रवर्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तिचा जामीनही फेटाळण्यात आला आहे. NCB ने  सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातली मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीला ड्रग्ज सेवन आणि इतर आरोपांखाली अटक केली. अंमली पदार्थ विरोधी विभागाने ही कारवाई केली त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एनसीबीने कोर्टामध्ये रियाच्या जामिनाला विरोध दर्शवत युक्तीवाद केला. रिया चक्रवर्ती या प्रकरणातली आरोपी आहे. तिला जामीन मिळाला तर त्याचा परिणाम या प्रकरणावर होऊ शकतो, असं एनसीबीने कोर्टात सांगितलं. दरम्यान रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी तिच्या जामिनासाठी कोर्टात बाजू मांडली. एनसीबीने रियाची चौकशी पूर्ण केली आहे त्यामुळे तिला जामीन मिळाला पाहिजे असं मानेशिंदे यांनी म्हटलं. मात्र कोर्टाने रियाचा जामीन फेटाळला आहे.

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत