devendra fadanvis uddhav thakrey

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडून देखील पोलिसांचा अपमान झाला होता…

महाराष्ट्र

विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात सध्या मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनात आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांकडून देखील अशाच प्रकारे पोलिसांचा अपमान झाल्याचं फडणवीस यांनी सभागृहात म्हटलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, ‘कंगना राणावत हिने मुंबई पोलिसांबाबत जे वक्तव्य केलं आहे त्याचा निषेधच आहे. तिचं वक्तव्य हे निषेधार्हच आहे. कारण गेली पाच वर्षी मी गृहमंत्री देखील होतो. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची नेमकी काय क्षमता आहे हे मला ठाऊक आहे. त्यामुळे नक्कीच कंगना राणावतच्या वक्तव्याने पोलिसांचा अपमान झाला आहे.’ असं फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले.

पण ते असंही म्हणाले की, ‘राजकीय इच्छाशक्तीमुळे अनेकदा पोलिसांवर मर्यादा येतात. आपल्याकडे नेहमीच पोलिसांच्या अकार्यक्षमतेबाबत बोललं जातं. एवढंच काय आपले आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हे कल्याणच्या सभेत याच पोलिसांच्या संदर्भात म्हणाले होते की, हे पोलीस भांडी धुण्याच्या लायकीचे आहेत. तेव्हा पोलिसांचा अपमान झाला नव्हता का? त्यामुळे आता भूमिका बदलल्या की व्यक्ती कशी बदलते हे आपण पाहतो आहेतच.’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की, आज माध्यमांच्या उल्लेखाबाबत बोलले जाते. पण ‘सामना’बाबत तीच भूमिका घ्याल का? पंतप्रधानाचा तिथे कसा उल्लेख केला जातो, हे सांगावे लागेल का?

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत