The body of a person
नाशिक महाराष्ट्र

आजेसासुचा अंत्यविधी करून घरी आल्यानंतर नातसुनेचाही मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. आजेसासुचा अंत्यविधी करून घरी आल्यानंतर कपडे वाळत घालत असताना विजेचा शॉक लागून नातसुनेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलीस तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या देवळा तालुक्यातील सावकी गावात हा प्रकार घडला. आकांक्षा कचवे यांच्या आजीसासू सुलकनबाई कचवे यांचा काल मृत्यू झाला होता. त्याचा अंत्यविधी आटोपून घरी परतल्यानंतर आकांक्षा काम करत होती. त्यानंतर ती कपडे वाळत घालण्यासाठी गेली असता तिला विजेच्या तारेचा शॉक लागला, त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. दीड वर्षांपूर्वीच आकांक्षाचा विवाह झाला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत