ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीला न्यायालयाने 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानुसार आज तिची पोलिस कोठडी संपली आज तिला कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, न्यायालयाने केतकीला दिलासा देण्यास नकार देत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, त्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ झाली असून, तिने जामिनासाठी ठाणे कोर्टात अर्ज […]
टॅग: judicial custody
मोठी बातमी! राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई, २४ एप्रिल : सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुट्टीकालीन न्यायालयानं हा निकाल दिला. या प्रकरणातील पुढील सुनावणी २९ एप्रिलला होईल. त्याआधी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय राणा दाम्पत्याकडे उपलब्ध आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी […]
नवाब मलिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, विशेष न्यायालयाकडून ईडीची मागणी मान्य
मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना विशेष न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत होते. मात्र, आजच्या सुनावणीदरम्यान ईडीने नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यास हरकत […]
अर्णव गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी; माझा जीव धोक्यात आहे – अर्णव गोस्वामी
रायगड : अलिबागच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये अर्णव गोस्वामी यांना भेटण्यासाठी त्यांचे वकील आणि घरचे लोक सातत्याने येत आहेत. यावेळी अर्णव यांच्यापर्यंत मोबाईल फोन पोहोचवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या मोबाईलवरुन अर्णव गोस्वामी यांनी एक फोन केल्याचेही समजते. सध्या पोलिसांकडून या सगळ्याची अंतर्गत चौकशी सुरु आहे. परिणामी अर्णव गोस्वामी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी असल्याचे निष्पन्न झाले.भविष्यात […]
रिया आणि शौविक चक्रवर्तीला २० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
ड्रग केस प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती या दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने दिले. रिया आणि शौविकच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज (६ ऑक्टोबर) संपत होती. त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तपास सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने रिया आणि […]
रिया चक्रवर्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
रिया चक्रवर्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तिचा जामीनही फेटाळण्यात आला आहे. NCB ने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातली मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीला ड्रग्ज सेवन आणि इतर आरोपांखाली अटक केली. अंमली पदार्थ विरोधी विभागाने ही कारवाई केली त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एनसीबीने […]






