ड्रग केस प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती या दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने दिले. रिया आणि शौविकच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज (६ ऑक्टोबर) संपत होती. त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तपास सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने रिया आणि शौविकच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्याचा निर्णय घेतला.
रिया चक्रवर्तीने जामीन मिळवण्यासाठी अर्ज सादर केला आहे. या अर्जावर मुंबई उच्च न्यायालय उद्या निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. तिने आधी मुंबईच्या सत्र न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी याचिका केली होती. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर रियाने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली.