Sunny Deol infected with corona

सनी देओल यांना कोरोनाची लागण

मनोरंजन

अभिनेता आणि गुरदासपूरचे भाजप खासदार सनी देओल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ते गेल्या काही काळापासून हिमाचल प्रदेशच्या कुल्लू येथे राहत होते आणि मुंबईला जाण्याची तयारी करत होते. कोविड प्रोटोकॉलअंतर्गत ते मुंबईला जाण्यापूर्वी जेव्हा त्यांची कोरोना चाचणी झाली, तेव्हा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी ही माहिती दिली. सनी देओल आणि त्यांचे काही मित्र कुल्लूमध्ये होते. ते मुंबईकडे परत जाण्याचा विचार करीत होते. प्रोटोकॉलनुसार, मंगळवारी कोरोना टेस्ट घेण्यात आल्या तेव्हा त्यांना संसर्ग झालेला आढळला. सनी देओल ३ डिसेंबर रोजी मनालीहून मुंबईकडे परत जाणार होते. आता त्यांना मुंबईला परत येणे कठीण झाले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत