Police Detained Ketaki Chitale After Controversial Post On Sharad Pawar
ठाणे महाराष्ट्र मुंबई

केतकीला दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार, अभिनेत्री केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीला न्यायालयाने 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानुसार आज तिची पोलिस कोठडी संपली आज तिला कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, न्यायालयाने केतकीला दिलासा देण्यास नकार देत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, त्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ झाली असून, तिने जामिनासाठी ठाणे कोर्टात अर्ज केला आहे. कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर गोरेगाव पोलिसांना केतकीचा ताबा मिळणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गेल्या सुनावणीत केतकीने स्वत: न्यायालयात युक्तिवाद केला होता कि, “ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणे गुन्हा आहे का?” असा सवाल देखील तिने केला होता. केतकीने सांगितलं की, मी ही पोस्ट डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे, असे देखील तिने कोर्टासमोर म्हटले होते.

केतकीला न्यायालयात हजर केल्यानंतर तिने केलेल्या आक्षेपार्ह्य पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कोठडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. ठाणे गुन्हे शाखेने 5 दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाकडे मागितली होती. मात्र न्यायालयाने केतकीला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केतकीने फेसबुकवर शेअर केली होती. तसेच, संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा उल्लेख करून बदनामी केली होती. याप्रकरणी केतकीच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहे. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी देखील याचा निषेध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून राज्यात अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले असून तिला अटक करण्यात आली आहे. केतकीवर राज्यभरात गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरूच आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत