मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या जीवनावर आधारित ‘न्याय: द जस्टिस’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस बजावली. सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी OTT प्लॅफॉर्म्सवर चित्रपटाचे प्रसारण थांबवण्याची विनंती करणारी याचिका दाखल केल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली. उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशाने चित्रपटाच्या स्ट्रीमिंगवर स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर कृष्ण किशोर सिंह यांनी […]
टॅग: Sushant Singh Rajput
सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरण : रिया चक्रवर्तीने सुशांतसाठी अनेकदा खरेदी केला गांजा, NCB चा मोठा दावा
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात दावा केला आहे की, रिया चक्रवर्ती हिने तिचा भाऊ शोविकसह अनेक वेळा गांजा विकत घेतला आणि सुशांत सिंग राजपूतला दिला. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने गेल्या महिन्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत ३५ आरोपींविरुद्ध न्यायालयात अर्ज दाखल केला होता, ज्याची सुनावणी मंगळवारी झाली. आरोपांच्या मसुद्यानुसार, […]
सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरण : सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठाणीला जामीन मंजूर
मुंबई : बॉलीवूड अभिनेता दिवंगत सुशांत सिंग राजपूतचा माजी रूममेट सिद्धार्थ पिठाणी याला सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट (NDPS कायदा) अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी पिठाणीला 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पिठाणीने उच्च न्यायालयात धाव […]
सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरण : रिया चक्रवर्ती आणि शोविक विरुद्ध NCB कडून आरोपपत्र दाखल
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि इतरांवर मुंबईतील विशेष न्यायालयात आरोप दाखल केले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 जुलै रोजी होणार आहे. सध्या या प्रकरणात न्यायालयाने आरोप निश्चित केलेले नाहीत. विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी न्यायालयात […]
सुशांत सिंग राजपूत केस : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला कोर्टाकडून परदेशात जाण्यासाठी परवानगी
मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने तिला सशर्त परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. कोर्टाने सांगितले की, अभिनेत्रीला अबुधाबीमधील भारतीय दूतावासात दररोज हजेरी लावावी लागेल आणि 6 जून रोजी कोर्टासमोर हजेरी पत्रक सादर करावे लागेल. यासोबतच तिला अतिरिक्त सुरक्षा म्हणून एक लाख […]
“न्याय: द जस्टीस” चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली सुशांतच्या वडिलांची याचिका
नवी दिल्ली : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या वडिलांनी सुशांतच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली आहे. एप्रिल महिन्यात सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी ही याचिका दाखल केली होती. सुशांतच्या वडिलांनी युक्तिवाद केला होता की सुशांतच्या खाजगी जीवनाचे कोणतेही […]
NCB ची मोठी कारवाई, सुशांतला ड्रग्ज पोहोचवणारा ड्रग पेडलर हरीश खानला अटक
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) हाती त्याच्यापर्यंत ड्रग्ज पोहोचवणारा ड्रग पेडलर लागला आहे. हरीश खान नावाच्या या ड्रग पेडलरला एनसीबीने वांद्रेमधून अटक केली आहे. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 28 मे रोजी सुशांत सिंह राजपूतचा रूम पार्टनर आणि जवळचा मित्र सिद्धार्थ पीठानीला हैदराबादमधून अटक केली होती. एनसीबीने नीरज […]
सुशांतसिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला हैदराबादमधून अटक
मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला एनसीबीने अटक केली आहे. एनसीबीने पिठानी याला ड्रग्स प्रकरणात हैदराबादमधून अटक केली आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने यापूर्वी सिद्धार्थ पिठानी याची अनेक वेळा चौकशी केली होती. सीबीआयने सप्टेंबर 2020 मध्ये त्याची सलग अनेक दिवस चौकशी केली होती. ड्रग्स प्रकरणात यापूर्वीही बर्याच लोकांना […]
ब्रेकिंग : सुशांतसिंग राजपूतची बहीण प्रियंकाची सुप्रीम कोर्टात धाव, FIR रद्द करण्याची मागणी
नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंग राजपूतची बहीण प्रियंका सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रियंका सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून तिच्याविरूद्ध दाखल केलेली FIR रद्द करण्याची मागणी केली आहे. 7 सप्टेंबर 2020 रोजी रिया चक्रवर्ती हिने सुशांतच्या बहिणींविरूद्ध मुंबईच्या वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये बनावट प्रिस्क्रिप्शन आणि प्रतिबंधित असलेली औषधे […]
ब्रेकिंग : सुशांतची बहीण प्रियंकाच्या अडचणीत वाढ, रियाने केलेली FIR रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
अभिनेता सुशांत सिंग राजपूतची बहीण प्रियंकाविरूद्ध दाखल केलेली FIR रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (15 फेब्रुवारी) नकार दिला. परंतु, त्याची दुसरी बहीण मितूविरुद्ध दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याचा आदेश देण्यात आला त्यामुळे तिला दिलासा मिळाला आहे. ही FIR सुशांतसिंग राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्तीने दाखल केली होती. पटना येथे सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये रिया […]







