अफगाणिस्तान : अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतली आहे. काल रात्री 12 वाजण्यापूर्वी शेवटच्या अमेरिकन विमानाने काबूल विमानतळावरून उड्डाण केले आणि याबरोबरच वीस वर्षांपूर्वी सुरू झालेले अफगाणिस्तानमधील अमेरिकेचे युद्धही संपले. जवळजवळ २० वर्षे असलेली अफगाणिस्तानातील अमेरिकेची उपस्थिती संपुष्टात आली आहे. अमेरिकेची शेवटची तीन लष्करी विमाने सोमवारी रात्री काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडाली, अफगाणिस्तानातील अमेरिकन लष्करी कारवाईचा अंत झाला.
आरटीचे मुराद गझदीव यांनी ट्वीट केले की युद्ध संपले आहे. ही लढाई 19 वर्षे, 10 महिने आणि 25 दिवस चालली. उरलेले अमेरिकन सैनिक नुकतेच काबूल विमानतळावरुन निघाले आहेत.
The US war in Afghanistan lasted 19 years, 10 months and 25 days.
The war is over. America’s last troops have just left Kabul airport.
The Taliban won
— Murad Gazdiev (@MuradGazdiev) August 30, 2021
अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडत असल्याची पेंटागॉनने पुष्टी केली. अमेरिकन सैन्याने काबूल सोडल्यानंतर तालिबानने हवेत गोळ्या झाडून विजय साजरा केला.
Just listen to the intensity of the celebratory gunfire in Kabul.
I get the sense the Taliban expended more ammunition on celebration than on actual combat over the past month
Going to be fun trying to sleep tonight pic.twitter.com/Jbq48O5WIg
— Murad Gazdiev (@MuradGazdiev) August 30, 2021




