car accident speeding audi collides with electric pole in bengaluru
देश

ऑडी कार विजेच्या खांबाला धडकून भीषण अपघात, आमदाराच्या मुलगा आणि सुनेसह ७ जणांचा मृत्यू

बंगळुरु : बंगळुरुच्या कोरमंगलामध्ये ऑडी कारचा भीषण अपघात झाला. कारचा वेग खूप जास्त असल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ही कार विजेच्या खांबाला जाऊन धडकली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तामिळनाडूचे डीएमकेचे आमदार वाय प्रकाश यांचा मुलगा करुणा सागर आणि सून बिंदू यांच्यासह ७ जणांचा मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असून कारमधील सर्वजण 20 ते 30 वयोगटातील होते. हे सर्वजण ऑडी कार घेऊन रात्री फिरायला निघाले होते. रस्ता पूर्णपणे रिकामा असल्याने या गाडीचा चालक वेगाने गाडी चालवत होता. गाडी वेगात असल्यानं चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी फुटपाथवर चढून विजेच्या खांबाला जोरात धडकली. रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील कुणीही सीटबेल्ट लावलेला नव्हता. या प्रकरणी आडुरुडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत