ऑस्ट्रेलिया : स्कायडायव्हिंग स्पर्धेदरम्यान पॅराशूट न उघडल्यामुळे एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तथापि, हा तरुण खूपच अनुभवी स्कायडायव्हर होता. रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पर्थच्या उत्तरेकडील ज्युरियन बे येथे व्हर्च्युअल नॅशनल स्कायडायव्हिंग स्पर्धेदरम्यान हा अपघात झाला.
वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातील ज्युरियन बे येथे स्कायडायव्हिंग स्पर्धेत एका तरुणाने सहभाग घेतला होता. सोलो विंगसूट परफॉर्म करताना त्याने विमानातून हवेत उडी मारली. पण त्याचा पॅराशूट उघडलाच नाही. त्यामुळे तो उंचावरून थेट जमिनीवर पडला. घटनेनंतर तात्काळ आपत्कालीन टीमने त्याला रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अपघातात बळी पडलेला तरुण खूप अनुभवी स्कायडायव्हर होता. त्याने त्याच्या 6००० जंप पूर्ण केल्या होत्या. या दुर्घटनेची ऑस्ट्रेलियन पॅराशूट फेडरेशनमार्फत चौकशी केली जाणार आहे. तसेच पॅराशूटमध्ये झालेल्या बिघाडाचा आणि त्याच्या कारणाचा शोध घेण्यात येणार आहे.




