कोची : कोचीला जाणाऱ्या एअर अरेबियाच्या फ्लाइटला (G9- 426) कोची विमानतळावर उतरताना हायड्रोलिक बिघाड झाला. विमान युएईमधील शारजाहहून केरळमधील कोचीला येत असल्याचे विमानतळाने सांगितले. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने शुक्रवारी याबाबत सांगितले.
तथापि, विमानाचे सुरक्षितपणे लँडिंग झाले असून विमानातील सर्व 222 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, कोची विमानतळावर विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. चेन्नईला जाणारी इंडिगोची पहिले फ्लाइट रवाना झाली. 8:22 वाजता संपूर्ण आणीबाणी मागे घेण्यात आली.
A Kochi-bound Air Arabia flight (G9- 426) departed from Sharjah in UAE and had a hydraulic failure while landing at Kochi airport, today evening. The aircraft landed safely. All 222 passengers and 7 crew members on board are safe: Cochin International Airport Authority pic.twitter.com/1bGS7xygTY
— ANI (@ANI) July 15, 2022




