Pune Tilak Road Two Groups Ruckus Attack, Video Viral
पुणे महाराष्ट्र

पुण्यात राडा! टिळक रोडवर दोन टोळ्यांचे एकमेकांवर कोयता आणि दगडाने वार, 9 जण गंभीर

पुणे : पुण्यातील टिळक रोडवर तरुणांनी राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यात दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. जोंधळे चौक भागात १० ते १२ जणांच्या दोन टोळक्यानी एकमेकांवर हल्ला चढवला होता. तरुणांनी परस्परांवर कोयता आणि दगडाने वार करत मारहाण केली. पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून काही जण पळून गेले आहेत. या हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुण्यातील सिंहगड परिसरातून 6 जण रिक्षातून पुण्याच्या मध्यभागी असलेल्या कुमठेकर रोडवर आले आणि तिथे दहशत मजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते टिळक रोडवर आले आणि तिथं उभे असलेल्या एका नागरिकाला कोयत्याने मारहाण केली. असे एकूण 3 जणांवर हल्ला केला. जोंधळे चौक भागात १० ते १२ जणांच्या दोन टोळक्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला. तरुणांनी एकमेकांवर कोयता आणि दगडाने वार करत मारहाण केली. या हल्ल्यामध्ये ९ युवक गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं.

घटनेच्या वेळी रस्त्यावर अनेक जण उपस्थित होते. त्यांनी ही घटना कॅमेरात कैद केल्यानंतर याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. उपस्थितांनी हा प्रकार जवळच्या पोलीस स्थानकात कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आरोपींनी पोलिसांवरही हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस घटनास्थळी गेले असता एका कर्मचाऱ्याला त्यांनी चावा घेतला. पोलिसांनी जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल केलं आहे. सपा महाविद्यालयाजवळील टिळक रोडसारख्या गजबजलेल्या परिसरात हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. सर्व प्रकारणाचा तपास विश्रामबाग ठाण्यातील पोलिस निरीक्षक सुनिल माने करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत