Controversial result of Nagpur bench again
महाराष्ट्र मुंबई

WhatsApp ग्रुपच्या अ‍ॅडमिनला मोठा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

मुंबई : व्हॉट्स अ‍ॅपवर कुणीही काहीही पोस्ट केले वा वादग्रस्त मेसेज टाकले तर त्या मेसेजप्रकरणी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे ग्रुप अ‍ॅडमिनला मोठा दिलासा मिळणार आहे. संबंधित मेसेजमागे ग्रुपचा सामाईक हेतू नसेल तर अ‍ॅडमिनला दोष देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि न्यायमूर्ती अमित बी. बोरकर यांनी हा निकाल दिला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जुलै 2016 मध्ये व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या 33 वर्षीय अ‍ॅडमिनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रुपमधील एका सदस्याने ग्रुपच्या महिला सदस्याविरोधात असभ्य, अश्लिल भाषेचा वापर केला होता. त्याप्रकरणी ग्रुप अ‍ॅडमिनलाही जबाबदार धरण्यात आले होते. तसेच या सदस्यावर कारवाई न केल्याप्रकरणी ग्रुप अ‍ॅडमिनविरोधात गोंदियाच्या महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. उच्च न्यायालयाने अ‍ॅडमिनविरोधातील गुन्हा रद्दबातल ठरवून मोठा दिलासा दिला. याचवेळी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.

या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला मोठा दिलासा दिला आहे. तसेच न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधील एका सदस्याने महिला सदस्याविषयी असभ्य भाषेचा वापर केला आहे. मात्र यामागे कुठलाही सामाईक हेतू सिद्ध होत नाही. ग्रुप सदस्याच्या मताचा ग्रुप अ‍ॅडमिनशी कुठलाही संबंध दिसत नाही. अशा प्रकारे सामाईक हेतू नसताना आक्षेपार्ह मेसेजप्रकरणी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही. व्यक्ती ज्यावेळी एखादा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार करते, त्यावेळी त्या ग्रुपमध्ये जोडल्या जाणाऱ्या सदस्यांच्या गुन्हेगारी कृतींची अ‍ॅडमिनला आधीच कल्पना असू शकत नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत